सायकल चालवा,निरोगी रहा,नशामुक्ती जनजागृती करुन सलग सहा वर्ष सामाजिक बांधिलकी जपणारा लोणावळा सायकलीग क्लब



मावळ मराठा न्युज -लोणावळा,सायकलीग क्लब आपल्या समाजासाठी सायकल चालवा निरोगी रहा हा मंत्र गेल्या सहा वर्षांपासून देत आले आहेत, लोणावळा शहर पोलीस विभागाने हाती घेतलेले नशा मुक्ति अभियान पुढे नेण्याचे काम हा सायकलीग ग्रुप खऱ्या अर्थाने करत आहे.सायकल चालवत असताना महाराष्ट्रातील विविध किल्ले, नैसर्गिक ठिकाणे, मंदिर अश्या ठिकाणी सायकली वर जाणे हा यांचा छंद झाला आहे. प्रत्येक वर्षी महाराष्ट्राच्या जवळचे राज्या ना सायकलिंग करत जानेवारी तेथील एक एतिहासिक ठिकाणी भेट देणे हा या ग्रुप चा एक महत्वाचा उपक्रम आहे. या वर्षी या ग्रुपचे सदस्य श्री. नितेश कुटे व श्री. भरत भरणे यांनी कर्नाटक राज्यातील हम्पी या ठिकाणी भेट देण्याचे नियोजन केले आहे.लोणावळा ते हम्पी हा ६५० की.मि.चा प्रवास चार दिवसात ही टीम पार करणार आहे.या टीम मध्ये श्री. नितेश कुटे, श्री. भरत भरणे, श्री. कैलास कडूसकर, श्री. अमोल रसाळ,श्री. कमल परदेसी तळेगाव हे सहा सदस्य सहभागी होणार आहेत.दर वर्षी हा ग्रुप २६ /११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस बांधवांना मानवंदना देण्यासाठी पुणे -लोणावळा -मुंबई अशी रॅली आयोजित करत असतो. याही वर्षी २४ /११ ला ७० सायकल प्रेमी नि यामध्ये सहभाग घेतला होता..लोणावळा येथील सर्व सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, अधिकारी वर्ग यांचे सहकार्य या ग्रुप ला सतत मिळत असते.




