हभप डॉ. विजय दादा महाराज जगतापयांना जर्मन युनिव्हर्सिटीचा संत साहित्य,तत्वज्ञान डॉक्टरेट पदवी प्रदान

मावळ मराठा न्युज- पुणे, हभप डॉ. विजय दादा महाराज जगताप,गाव -मारणेवाडी, तालुका – मुळशी, वास्तव्य पुणे, यांना जर्मन युनिव्हर्सिटी कडून संत साहित्य आणि तत्वज्ञान या विषयात डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.विजय दादा हे वारकरी संप्रदाय मधील प्रख्यात कीर्तनकार आहेत.हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे त्यांनी रीतसर शिक्षण घेतले आहे. ते पुण्यातील ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ञ देखील आहेत.त्यांनी स्वतः काही ग्रंथ लिहिले आहेत. उत्तम लेखकविचारवंत आहेत.थोर संत नाथ संप्रदाय चे संत श्रीमद् सदगुरु पांडुरंग नाथ महाराज जगताप यांचे विजय दादा हे नातू आणि त्यांच्या गादीचे उत्तर अधिकारी आहेत. आपल्या आजोबांच्या नावाने संस्था स्थापन करून २०० हून अधिक विद्यार्थ्यांना मोफत संगीत आणि संस्कार वर्गाचे शिक्षण देतात. कोणत्या ही देणगी शिवाय गोशाळा चालऊन देशी गायींची सेवा संगोपन करतात. अनेक विद्यार्थ्यांना मदत करतात.आपल्या प्रासादिक वाणीने संपूर्ण महाराष्ट्भर संत विचारांचा प्रचार, प्रसार करत आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page