हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड’ यांची सीएसआर अंतर्गत नॅब होम फॉर एजिंग ब्लाइंड खंडाळा संस्थेस मदत

मावळ मराठा न्युज- खंडाळा,दि. २७/६/२०२५ या दिवशी हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड’ विवी पुणे यांच्या सीएसआर निधीअंतर्गत संकल्प प्रकल्पाद्वारे नॅब होम फॉर एजिंग ब्लाइंड खंडाळा संस्थेस ऊर्मी संस्था पुणे यांच्या सहकार्यातून बेडस, कपाटे,रॅक,प्रेशर वॉशर मशिन इ. अत्यावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.नॅब होम फॉर एजिंग ब्लाइंड खंडाळा येथे झालेल्या कार्यक्रमास हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड सौम्या बक्षी,शिवकांत चव्हाण,रोहित वाकळे तसेच ऊर्मी संस्थेमार्फत प्रकल्प समन्वयक राहुल चुनीदास व दिलीप तिडके आवर्जुन उपस्थित होते. नॅब होम फॉर एजिंग ब्लाइंड खंडाळा संस्थेच्या समन्वयक नीलम शेख यांनी उपस्थितांना संस्थेच्या वाटचालीबाबत माहिती दिली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page