छत्रपती शिवाजी महाराज परिसर सुशोभीकरण चांगल्या दर्जाचे व्हावे तर भांगरवाडी उड्डाणं पुलाचे काम लवकर करा शिवसेनाचे लोणावळा नगरपरिषदेला निवेदन




मावळ मराठा न्युज:- लोणावळा,लोणावळा शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या भागात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारकाचे काम मंजूर झाले असून ते काम चांगल्या दर्जाचे करून लवकरात लवकर मार्गी लावावे. तसेच भांगरवाडी उड्डाणं पुलाचे कामही मंजूर असून ते अर्धवट असून एक दोन वर्षांपासून काम बंद असल्याने भांगरवाडी व नांगरगाव व परिसरातील नागरिकांना, विध्यार्थी, महिला भगिनी, कामगार वर्ग,वृद्धाना यामुळे रोज नाहक त्रास होत आहे त्यामुळे ह्या उड्डाणं पुलाचे कामही आपण लवकर मार्गी लावावे ह्या दोन्ही कामाचे निवेदन आज लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, महिला आघाडी शहरसंघटिका मनीषाताई भांगरे, युवासेना शहर अधिकारी विवेक भांगरे, सोशल मीडिया शहर समन्व्यक नंदू कडू, शहर सल्लागार पराग राणे, महिला आघाडी उपशहर संघटिका आयेशा शेख, रेल्वे विभाग प्रमुख प्रमोद लोयरे, उपविभाग प्रमुख प्रसाद कन्नन आदी पदाधिकारी उपस्थित होतें.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे कामाला सुरुवात झाली असून चांगल्या दर्ज्याचे काम केले जाईल व भांगरवाडी व नांगरगाव उड्डाणं पुलासाठी काही तांत्रिक अडचणीची पूर्तता करून भांगरवाडी उड्डाणं पुलाचे हीं काम लवकरच चालू होईल असे आश्वासन मुख्याधिकारी श्री अशोक साबळे यांनी दिले.




