*घरगुती गॅस सिलिंडर चोरणाऱ्या चोरास लोणावळा शहर पोलिसांनी केले गजाआड*

मावळ मराठा न्यूज-श्रावणी कामत हिसकडून लोणावळा,दि.०८/०८/२०२५ रोजी सायंकाळी साडेपाच ते ६ वाजण्याचा प्रियदर्शनी संकुल गाळा नं. ८ गावठाण लोणावळा चे समोर असलेले रोडवर लावलले पॅगो टेम्पो नं. MH 14 JP 7606 नं. यामधील १ सिलेंडर इतर लोणावळा परीसरातुन ५ भारत गॅसचे सिलेंडर ऑक्टीव्हा मोटार सायकल त्याचे पुढे व पाठीमागे नं. नसलेली यावरुन चोरी करुन चोरुन नेले त्या अनोळखी सिलेंडर चोरा विरुद्ध कायदेशीर तक्रार नोंदवण्यात आली. त्या चोराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.त्याचेकडून चोरीस गेलेला माल १) १८००० /- रु भारत गॅस कंपनीचे ६ सिलेंडर १४ .२ kg चे घरगुती सिलेंडर किमत अंदाजे १८००० /- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यासंदर्भात विरेंद्र विठठल पवार वय ३५ वर्षे धंदा व्यवसाय रा. जुना खंडाळा नागपाल सोसा. खंडाळा ता मावळ जि पुणे यांनी फिर्याद दिली होती. लोणावळा शहर पो.स्टे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोना शिंदे /११९३ तपासी अंमलदार सहा फौजदार शेख हे पुढील तपास करीत आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page