गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ व शपथविधी संपन्न









मावळ मराठा न्युज – लोणावळा,विद्या विनय सभा, लोणावळा संचलित गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थी कौन्सिलचा पदवीदान व शपथविधी समारंभ दिनाक २४ जुलै २०२६ रोजी दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. सभापती लो. न. पा. शिक्षण मंडळ व मावळ वार्ता फाउंडेशनचे मा. अध्यक्ष व सल्लागार समिती सदस्य श्री. जितेद्र धीरूभाई कल्याणजी यांनी समारंभाचे अध्यक्षपद भूषविले. या पदवीदान समारंभात शाळेचे हेड बॉय, हेड गर्ल, चारही हाऊसचे कॅपटन व व्हाइस कॅप्टन , प्रीफेक्टस तसेच विविध समित्यांचे प्रमुख यांना बॅचेस व स्कार्फ देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व उत्कृष्ठ संचलन सादर केले.या कार्यक्रमात शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक शिक्षक कार्यकारणीचे सदस्य, गुरुकुल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. बयाजी खुरंगे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुष्का कालगुडे उपस्थित होते. नवनिर्वाचित हेड बॉय कुमार श्रेयस पाटील व हेड गर्ल कुमारी तनिष्का स्वामी यांनी आपले विचार आणि शाळेप्रती असलेली आपली कर्तव्य व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. जिनेंद्र कल्याणजी यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्याध्यापक श्री. बयाजी खुरंगे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुष्का कालगुडे यांनी देखील आपली मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे नियोजन व तयारी शाळेचे शारीरिक शिक्षण विषयाचे शिक्षक श्री. सुरेश राठोड व पर्यवेक्षिका सौ. वंदना पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह शिक्षिका सौ. शिवानी खिल्लारे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन सौ. पूजा परीठे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने करण्यात आली.



