SRCC मुंबई व रोटरी क्लब ऑफ लोणावळा आयोजित लहान मुलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर



मावळ मराठा न्युज – लोणावळा, वार रविवार दि. १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ .०० वाजताशिवदुर्ग हॉल,प्रियदर्शनी संकूल,जैन मंदिरा शेजारी , गावठाण,लोणावळा येथे लहान मुलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे.या शिबीरात मुंबई हून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमधील तज्ञ डॉक्टरांकडून लहान मुलांच्या बाबतीतील खालील लक्षणांची तपासणी करून त्यावर पुढील उपचार सुचवले जाणार आहेत. यात १ . चालण्यात असंतूलन२ . अवयवांचे विकार३ . स्नायुंचे विकार४ . हाडांना झालेली दुखापत५ . सेरेबल पाल्सी६ . पाठीच्या कण्याचे विकार७ . स्वमग्नता८ . अतिचंचलता९ . फिट / झटके येणे, शुद्ध हरपणे१० . स्नायुंचे आखडणे११ . शिक्षकण्यातील अक्षमता१२ . अनुवांशिक विकार१३ . भौतीक उपचार१४ . स्पीच थेरपी१५ . मानसशास्त्र व वर्तणूक थेरपी१६ . नजरेतील दोष या सर्व आजारांची मोफत तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे आपल्या अंगणवाडी / बालवाडी / नर्सरी /शाळेतील विद्यार्थी , आपली अथवा आपल्या परिचीत कोणी मुले असल्यास या विनामुल्य शिबीराचा त्यांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब कडून करण्यात आले आहे.त्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा.संपर्कआनंद गावडे-(सर)८८०६८८८८०५ , ८८८८००७५८८ आशिष मेहता-(रोटरी क्लब )-९२२६२२०१४८




