ज्ञानाशिवाय दुसरे काहीही तुमचे अंतःकरण शुद्ध करू शकत नाही – पूज्य माताजी



मावळ मराठा न्यूज:- लोणावळा,येथील हॉटेल चंद्रलोक येथे नुकतेच श्री स्वामिनी धनानंद सरस्वतीजी माताजी या श्री स्वामी परमात्मानंद सरस्वतीजी आणि पु. स्वामी श्री दयानंद सरस्वतीजी, आणि त्यांनी भागवत गीता, उपनिषद, संस्कृत आणि वेदांत याबाबत साध्या सोप्या भाषेत आपले विचार मांडले,त्यांनी भागवत गीता, उपनिषद, संस्कृत आणि वेदांत यांचा खोलवर अभ्यास करून राजकोट, कोईम्बतूर आणि ऋषिकेश येथे सघन निवासी अभ्यासक्रमात भाग घेतला आहे.पु.माताजी ‘ज्ञानाशिवाय दुसरे काहीही तुमचे अंतःकरण शुद्ध करू शकत नाही’ या ब्रीदवाक्याचे काटेकोरपणे पालन करतात. १६ वर्षांहून अधिक काळ शिक्षक, पालक आणि मुलांना शिकवणे, महिला सशक्तीकरण आणि अनेक सामाजिक सुधारणा उपक्रमांमध्ये त्या खोलवर गुंतलेल्या आहेत.पु.माताजी वेदांतला साधेपणाने आणि थेटपणाने स्पष्ट करतात ज्यामुळे दैनंदिन जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये आत्मसात करणे सोपे होते.




