करदात्यांचा पैशांवर डल्ला मारणाऱ्या आणि पैशांचा अपव्यव करणाऱ्या लोणावळा नगरपरिषदेचे नेमके चाललंय काय ❓



मावळ मराठा न्यूज – लोणावळा,लोणावळा नगरपरिषद प्रशासनाचा मनमानी कारभार सुरु आहे.गेंड्याचा कातडीच्या प्रशासनाला कितीही पाठपुरावा करा,कितीही प्रेमाने सांगा त्यांना जे करायचे तेच ते करीत असल्याचा अनुभव,नागरिक, लोकप्रतिनिधी,पत्रकार यांना सध्या येत आहे. तुम्ही कितीही आणि काहीही करा आम्हाला जे करायचे तेच आम्ही करणार असा अलिखित नियम कॅप्टन ने खालच्या अधिकाऱ्यांना घालून दिला असल्याचा अनुभव सर्वाना येतोय. नागरिकांवर कायद्याचा बडगा उचलून कायदेशीर कारवाई करणारे पालिका प्रशासन मात्र सर्व कायदा आणि नियम यांचे उल्लंघन करुन पायदळी तुडवीत आहे. असा आरोप पालिका प्रशासनविरोधात आत्मदहनाचा प्रयत्न करणारे माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव यांनी केला आहे. त्यात त्यांनी हुडको जवळील फ्लड लाईन नियमांचे उल्लंघन करुन नदीपात्रा शेजारीच २० ते २८ लाख खर्चून पालिकेने भुयारी गटाराचे कार्यालय थाटले असून त्याठिकाणी पालिकेने जेसिबी,मल निःस्सारन वाहन आणि इतर वाहन उभी केली आहेत. त्यामुळे नागरिकांवर कायद्याचा बडगा उगरणाऱ्या पालिका प्रशासनावर कारवाई कोण करणार असा सवाल बाळासाहेब जाधव यांनी केला आहे. तसेच लोणावळा नगरपरिषद मल निस्सारण वाहन डम्म करण्याचे १७०० ते १८०० रुपये इतका आकार घेते परंतु पालिकेची गाडी बंद पडली आहे असे कारण सांगून पालिका त्या वाहनावर असलेला कर्मचारी ने स्वतः वाहन घेऊन एका ट्रिप ला ३५०० /- ते ४ हजार घेऊन नागरिकांची लुबाडणूक करत असल्याचा आरोप देखील जाधव यांनी केला आहे. गेली तीन साडेतीन वर्षे पालिकेवर प्रशासन कारभार चालवीत आहे त्यामुळे पालिका प्रशासनाकडून मनमानी कारभार सुरु आहे.कोणाचे कुणावर कसलेही नियंत्रण नाही. असा ढिसाळ कारभार पालिकेचा चालू आहे यात करदाते लोणावळेकर यांचा पैशांचा अपव्यव होतोय एवढे मात्र नक्की.फ्लड लाईन नियम यावर प्रशासनाची प्रतिक्रिया विचारली असता प्रशासन कडून आम्ही कोणतेही पक्के बांधकाम केलेले नाही,आणि मनुष्य वस्ती तिकडे नाही असे उत्तर देण्यात आले. मात्र इंद्रायणी नदीतच मल डम्प केला जातोय त्यावर आणि लोणावळा नगरपरिषदेचा कर्मचारी नागरिकांना दाम दुप्पट घेऊन लुबाडणूक करीत आहे यावर प्रशासन उत्तर देऊ शकलेले नाही.




