निगडीत शेखबाबा ट्रस्टच्या वतीने साडी वाटप, दुःख दूर करण्याची दवा बनले पाहिजेत- मानव कांबळे


मावळ मराठा न्युज:-पिंपरी(प्रतिनिधी) निगडी यमुनानगर शेख बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरिब महिलांनाशिरखुर्मा आणि साडी वाटप करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते मानव कांबळे, छावा संघटनेचे धनाजी येळकर , पत्रकार शिवाजी घोडे,सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कोलते, सुनील राणे,प्रिया कोलते,रेश्मा साळवी,सुरेखा फड,ट्रस्टचे अध्यक्ष बाबा शेख,समीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मानव कांबळे म्हणाले कि, एकमेकांना मदत केल्यास समाजात नक्कीच बदल घडेल. आपल्याकडे अफाट संपत्ती असून कुणाच्याही उपयोगात येत नसेल तर ती संपत्ती पेपरच्या रद्दीसमान आहे. आयुष्यात गरिबांना गरजूंना मदत देण्याची वृत्ती ठेवा.गरजूंना मदत करणे म्हणजेच मानवता धर्म पाळणे होय. समोरच्याची गरज पाहून मदत करा. गरजू मुलांची गरज बघून पुस्तके, शालेयसाहित्य, कपडे द्या. गरज बघून मदत करावी.मी नास्तिक आहे पण मानवतेलाच धर्म मानतो. कुठल्याही धर्माच्या मानवहिताचा संदेशाचे मी पालन करतो. केवळ ‘दुआ’ करून उपयोग नाही, तर मानवाचे दु:ख दूर करण्याची ‘दवा’ बनले पाहिजे.भारताच्या स्वातंत्र्यासाठी साडे सहा लाख शहीद झाले त्यातील सुमारे २ लाख मुस्लीम होते. सर्व जाती धर्माच्या शहिदांनी पाहिलेले मानवतेचे स्वप्न आज आपल्याला जपायचे आहे.कार्यक्रमाचे आलम शेख तर आभार समीर शेख यांनी मानले.




