पुणे ग्रामीण जिल्हा स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत भोंडे हायस्कूलच्या आदिती गायकवाड ला सुवर्ण पदक


मावळ मराठा न्यूज़ :- लोणावळा – येथील ॲड बापूसाहेब भोंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुणे ग्रामीण जिल्हा स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.१७वर्षा खालील मुली या प्रकारात ४५ किलो वजनी गटात वयोगटात कु. आदिती सुनिल गायकवाड हीने सुवर्ण पदक पटकावले असून मुलांमध्ये ७३ किलो वजनी गटात शिवम तानाजी ढोबळे याने रौप्य तर ४९ किलो वजनी गटात निशांत दिपक कंधारे याने कास्य पदक मिळविले.खेड येथील श्री सुमंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरी बुद्रुक खेड सदर स्पर्धा पार पडली.विद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका आरती करकेरा व शिक्षक प्रमोद आंगरखे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी यश संपादन केले .संस्थेचे अध्यक्ष ॲड माधवराव भोंडे सचिव सौ राधिका भोंडे तसेच माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी थत्ते पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख माध्यमिक विभागाच्या उपमुख्यध्यापिका तृप्ती गव्हले प्राथमिक विभागाच्या उपमुख्यध्यापिका स्मिता इंगळे पर्यवेक्षिका शशिकला तिकोणे यांच्यासह संस्थेचे सदस्य व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.




