Land Rates In Maharashtra : वापरा ‘ही’ पद्धत आणि घरबसल्या ५ मिनिटात पहा तुमच्या जमिनीचे बाजारभाव,वाचा डिटेल्स


मावळ मराठा न्यूज:- (प्रतिनिधी) Land Rates in Maharashtra :- जर आपण जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहाराचा विचार केला तर सगळ्यात अगोदर महत्त्वाचे म्हणजे असे व्यवहार करण्याअगोदर आपल्याला आपल्या जमिनीचे रेडीरेकनर प्रमाणे म्हणजे शासकीय दरपत्रकानुसार बाजारभाव माहित असणे गरजेचे असते.शेती बातम्या,सरकारी योजना,शेती कायदे, पशु संवर्धन विषयक मोफत माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक कराजर आपण जमिनीच्या किमतींचा विचार केला तर गावानुसार किंवा जिल्ह्यानुसार देखील जमिनीच्या किमतींमध्ये बदल पाहायला मिळतो. अनेकदा सरकारी प्रकल्प उभारले जात असताना जसे की महामार्ग, रेल्वे मार्ग तसेच विविध जलसिंचन प्रकल्प इत्यादी मध्ये मोठ्या प्रमाणावर भूसंपादन केले जाते.अशावेळी आपल्याला संबंध जमिनीचे मार्केट व्हॅल्युएशन अर्थात बाजार मूल्य किती आहे? हे माहीत असणं खूप गरजेचे असते. तसेच आपण जेव्हा ही जमिनीची खरेदी किंवा विक्री करतो, अशावेळी देखील आपण राहत असलेल्या भागातील जमिनीचे सरकारी दर काय आहेत हे माहीत असते खूप गरजेचे आहे.एवढेच नाही तर आपण एखाद्या वेळेस शहरांमध्ये कुठल्यातरी व्यवसायासाठी किंवा ऑफिससाठी गाळा खरेदी करतो, त्यावेळी देखील त्या त्या भागातील जमिनीचा सरकारी दर आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे असते.परंतु बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की आपल्या जमिनीचे रेडी रेकनरनुसार दर नेमके कसे माहीत करून घ्यावेत किंवा कसे पाहावेत. त्यामुळे या लेखांमध्ये आपण आपल्या जमिनीचे शासकीय दर पत्रकानुसार दर ऑनलाईन पद्धतीने कसे पहावेत? याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत.या पद्धतीने पहा तुमच्या जमिनीचे बाजार भाव घरबसल्या१ – यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://igrmaharashtra.gov.in/ या लिंक वर जावे लागेल.२ – त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल व या ठिकाणी असलेल्या मुद्रांक या पर्यायाच्या अंतर्गत असलेल्या ई मूल्यांकन १ .९ या पर्यावर क्लिक करायचे आहे.३ – त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर नमूद करायचा आहे. मोबाईल नंबर नमूद केल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या कॅपच्या कोड तुम्हाला नमूद करणे गरजेचे आहेनंतर त्या ठिकाणी असलेल्या सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी त्या ठिकाणी नमूद अथवा प्रविष्ट करायचा आहे व सबमिट या पर्यायावर क्लिक करून त्याखाली असलेल्या नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.४ – नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एका नवीन पेजवर रिडायरेक्ट म्हणजेच नेले जाते. त्या ठिकाणी तुम्हाला शहरी, ग्रामीण आणि इतर असे पर्याय दिसतील. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कोणत्या भागातील जमिनीचा बाजार भाव पाहायचा आहे, त्यानुसार तुम्हाला क्लिक करायचे आहे.जर तुम्हाला ग्रामीण भागाचा जमिनीचा बाजार भाव पाहायचा असेल तर तुम्हाला रुरल या पर्यायावर क्लिक करावे लागेल. शहरी भागातील जमिनीचा बाजार भाव पाहायचा असेल तर अर्बन या पर्यायावर क्लिक करणे गरजेचे आहे.५ – तुम्हाला ग्रामीण भागातील बाजारभाव पाहिजे असेल तर तुम्हाला रुरल या पर्यावर क्लिक करावे लागेल. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होते. त्या ठिकाणी तुम्हाला शेती, फार्म हाऊस, शेत जमीन तसेच नॉन अग्रिकल्चर अर्थात एनए जमीन आणि एमआयडीसी जमीन इत्यादी प्रकार दिसतात.६ – समजा तुम्हाला शेत जमिनीचा भाव पाहिजे असेल तर शेती या पर्यावर क्लिक केल्यानंतर शेत जमिनीचे भाव पाहण्यासाठी असलेली पेज ओपन होते. या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला डिव्हिजन अर्थात विभाग निवडणे गरजेचे आहे. तुम्ही डिव्हिजन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर राज्यातील विविध विभाग तुमच्यासमोर तुमच्यासमोर ओपन होतील.७ – या विभागांमधून तुम्हाला ज्या विभागातील बाजार भाव पाहायचा आहे तो विभाग निवडणे गरजेचे आहे. उदा. तुम्हाला जर नाशिक विभागातील जमिनीचे बाजार भाव पहायचे आहेत तर तुम्ही नाशिक हा विभाग निवडावा. नाशिक विभाग निवडल्यानंतर तुम्हाला नाशिक विभागातील जिल्ह्यांची यादी दिसेल.त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ज्या जिल्ह्यातील बाजार भाव पाहिजे आहेत तो जिल्हा, तालुका आणि ज्या गावातील जमिनीचे बाजार भाव पाहिजे आहेत ते गाव निवडणे गरजेचे आहे. गाव निवडल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जमिनीचा किंवा प्लॉटचा प्रकार निवडणे गरजेचे आहे.८ – त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या पेजवर जमिनीची माहिती देणे गरजेचे आहे. म्हणजेच तुमचे जमिनीचे क्षेत्र किती आहे? ते संबंधित पेजवर नमूद करावे. समजा तुमची जमीन जर दोन हेक्टर असेल तर दोन हेक्टर नमूद करावे. त्यानंतर तुम्ही बाजार भाव पाहत असलेल्या जमिनीचे किती क्षेत्र बागायती आहे हे देखील नमूद करणे गरजेचे आहे. त्यानंतर नेक्स्ट या पर्यावर क्लिक करायचे आहे.९ – त्यानंतर जमिनीवर ऊस, फळबाग किंवा फुल शेती असल्यास त्या संपूर्ण जमिनीचे मूल्यांकन हे बारमाही बागायती नुसार केले जाते. यानंतर तुम्हाला परत नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर उघडलेल्या एका पेजवर फार्मर युज आणि कंपनी युज असे दोन पर्याय तुम्हाला दिसतात. या ठिकाणी तुम्ही फार्मर युज या पर्यायावर क्लिक करायचे आहे.त्यानंतर तुम्हाला जर कोरडवाहू क्षेत्र किंवा बागायती क्षेत्र यापैकी कोणत्या क्षेत्राचे बाजार भाव पाहिजे आहेत त्यानुसार क्षेत्र निवडायचे आहे. हे क्षेत्र निवडल्यानंतर सातबारावर जमिनीचे आकारणी अर्थात क्षेत्र किती आहे ते नमूद करायचे आहे. समजा तुमच्या जमिनीचे आकारणी जर सहा असेल तर तुम्ही ५ .१ पासून ७ .५ पर्यंत निवडू शकतात. या ठिकाणी तुमच्या जमिनीच्या आकारणीनुसार बाजूला असलेल्या पेजवर असलेले शासकीय भाव हे बदलत जातील.१० – त्यानंतर तुमचे जमीन हे बारमाही बागायती आहे की हंगामी तसेच जमिनीमध्ये कुठल्या प्रकारची पिके आहेत ते देखील नमूद करणे गरजेचे आहे. समजा तुम्ही बाजार भाव पाहत असलेल्या जमिनीवर एक हेक्टर ऊस असेल आणि त्या ठिकाणी केल्यानंतर त्या जमिनीचे त्या पिकानुसार बाजार भाव पाहायला मिळेल.११ – यानंतर तुम्हाला जर संबंधित जमिनीची स्टॅम्प ड्युटी पाहायची असेल तर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी या पर्यायावर ती क्लिक करायचे आहे. त्यानंतर ओपन झालेल्या पेजवर तुम्ही पाहत असलेल्या जमिनीचा एरिया किंवा ग्रामपंचायत, तसेच तुम्हाला ज्या जमिनीचा बाजार भाव पाहायचा आहे त्या जमिनीचा प्रकार निवडायचा आहे.हा निवडल्यानंतर तुमच्या खरेदी किंवा विक्रीचा प्रकार कोणता आहे? हे निवडणे देखील गरजेचे आहे. हा प्रकार निवडल्यानंतर खाली असलेले कॅल्क्युलेटर ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर त्या जमिनीचे स्टॅम्प ड्युटी देखील तुम्हाला समजू शकते.




