लोणावळ्यातील रखडलेल्या नांगरगाव ते भांगरवाडी यांना जोडणाऱ्या उड्डाण पुलासाठी ऍड.पूजा बुटाला यांचे थेट नितीन गडकरीना पत्र

मावळ मराठा न्यूज नेटवर्क -लोणावळा, बरेच वर्षापासुन नांगरगाव ते भांगरवाडी यांना जोडणा-या उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. सदर कामाचे टेंडर पारित होवून काम सुरु झाले असले तरीही पुन्हा सदर कामास स्थगिती मिळत आहे.नांगरगाव ते भांगरवाडी येथून जाण्यासाठी सध्या रेल्वेचा गेट पार करुन जावे लागते. त्यामुळे रेल्वेचे गेट पासिंग होताना सतत बंद होते आणि सदर गेट हे एकदा बंद झाले की अर्धा अर्धातास, एकतास रेल्वे मालगाडी जात असल्यामुळे बंद राहते,आणि तोपर्यंत रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूला वाहनांची गर्दी जमा होते.तसेच नांगरगाव हा औदयोगिक वसाहतीचा भाग असल्याने भांगरवाडी येथून बरेचजण कामासाठी नांगरगाव येथे जातात व त्यात ज्येष्ठ नागरिक, शाळेत जाणारी लहान मुले यांना देखील अर्धा अर्धा तास उभे रहावे लागते.त्यामुळे सदर रेल्वे गेट सतत बंद असल्याने लोणावळ्यातील नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सोसावा लागतो. सदर रेल्वे गेट बंद असल्याने पावसाळयात व कडाक्याच्या उन्हाळयात लोणावळेकर जास्त त्रस्त होत असतात.लोणावळयात रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम त्वरेने सुरु होवून पूर्ण झाले तर उपरोक्त नमूद वाहतूक कोंडी समस्यांना लोणावळयातील लोकांना सामोरे जावे लागणार नाही.तसेच सदर उड्डाण पुलामुळे कळत न कळतपणे लोणावळयातील तसेच मावळ मधील नागरिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील व लोणावळ्यात आर्थिक दृष्टया अजुन बळकट होवून लोणावळयासारख्या पर्यटनस्थळाला अजून चालना मिळेल.तसेच उड्डाण पुल बांधायला परवानगी मिळाली असली तरी देखील सदर रखडलेले काम नक्की कोणामुळे आडले? ते नागरिकांना समजत नाही त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात सदर कामाबददल असंतोष वाढत चालला आहे. सबब जनतेच्या मनातील असंतोष दूर करण्यासाठी रखडलेल्या कामास लवकरात लवकर गती देऊन मार्गी लावावे व आपणास शक्य झाल्यास आपण स्वतः प्रत्यक्षरित्या लोणावळा येथे भेट देवून सदर कामाची स्थळपाहणी करावी आणि लोणावळ्यातील त्रस्त नागरिकांच्या वतीने कळकळीची विनंती लोणावळ्यातील रहिवाशी असलेल्या ऍड.पूजा बुटाला यांनी थेट देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना लेखी पत्राद्वारे विनंती केली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page