संकल्प युवा प्रतिष्ठान दहीहंडी उत्साहात संपन्न, लकी ड्रा स्कुटी बक्षीस येथील अनिता सैनी यांना तर लोणावळ्यातील चार रत्नाचा गौरव








मावळ मराठा न्युज – लोणावळा,संकल्प युवा प्रतिष्ठान लोणावळा,खंडाळा शहर ची दहीहंडी उत्सव लकी ड्रॉ वर स्कुटी बक्षीस हे भाग्यवान असलेल्या अनिता सैनी भांगरवाडी या महिलेला मिळाले,दहीहंडी फोडलेल्या श्रीराम गवळी वाडा मंडळा ६६ हजार ६६६ चं बक्षीस तसेच लोणावळा शहराला नावालौकिक मिळवून देणाऱ्या यात लोणावळ्याच्या इतिहास आजच्या तरुणांपर्यंत पोहचवण्याचं काम करणाऱ्या आनंद नाईक,लोणावळा शहर पत्रकार संघांचे संस्थापक अध्यक्ष आणि जेष्ठ पत्रकार मावळ टाइम्स चे संपादक श्री चंद्रकांत बाळकृष्ण जोशी उर्फ सी बी, क्रीडा क्षेत्रात जिल्हा,राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर लोणावळ्याचं नाव कोरणाऱ्या सौ ज्योती दीपक कंदारे आणि प्रसिद्ध तमाशा कलावंत वग नाट्य लेखक स्वर्गीय सखाराम तारे यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. सदर पुरस्कार लोणावळ्यातील प्रसिद्ध सूत्र संचालक आणि मुलाखतकार बापूलाल तारे यांनी तो स्वीकारला अश्या चार दिग्गजाना पुरस्कार देऊन संकल्प युवा प्रतिष्टान ने मोठी सामाजिक बांधिलकी जपत दही हंडी उत्सव मोठ्या थाटात संपन्न केला.या पुरस्कार सोहळ्याचे सन्मान पत्र वाचन राजेंद्र चोहान यांनी केले यावेळी रणरागिणी गृप च्या मंजूश्री वाघ,लोणावळा नगरपरिषद माजी विरोधी पक्ष नेता देविदास कडू,संकल्प युवा प्रतिष्टान चे संस्थापक अध्यक्ष विनोद होगले आणि कार्यकर्ते यांनी हा दहीहंडी उत्सव अगदी शिस्तबद्ध पद्धतीने तडीस नेला त्याबद्दल संकल्प युवा प्रतिष्टानचे सर्वत्र कौतुक होत आहे. रात्री उशिरापर्यंत आलेल्या हजारो गोविंदा आणि बाहेर गावाहून दहीहंडी उत्सव पाहायला आलेल्या माता भगिनी लहान बाळं यांची भोजन आणि चहापान बिस्कीट व्यवस्था येथील नितीन अगरवाल यांच्या श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट यांनी केल्याने कुणाचीही गैरसोय झाली नाही लोणावळ्यातील दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात पार पडला.




