पीएम इंटर्नशिप योजना,२१ ते २४ वयोगटातील बेरोजगार तरुण तरुणीसाठी सुवर्ण संधी

मावळ मराठा न्युज नेटवर्क -लोणावळा- या योजनेच्या माध्यमातून देशातील उच्च ५०० कंपन्यांमध्ये एक कोटी युवक/युवतींना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. या योजनेसाठी लाभार्थ्याचे वय २१ ते २४ मध्ये असणे आवश्यक आहे. लाभार्थी १० वी, १२ वी, ITI, पदवीधर इत्यादी शैक्षणिक पात्रता धारण केलेला असावा. इंटर्नशिप कालावधी हा १२ महिन्याचा असेल. इंटर्नशिपच्या कालावधीमध्ये प्रती रु. ५,०००/- एवढे मानधन देय असेल, तसेच एकरकमी लाभ रु. ६,०००/- व विमा सुविधा उपलब्ध असेल. लाभार्थी युवक/युवतीने स्वत: https://pminternship.mca.gov.in/login/ या website वर जाऊन आपली दि. ३१ मार्च २०२५ पूर्वी नोंदणी करावी. नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे. यासाठी लागणारी आवश्यक माहिती वरील वेबसाईट वर देण्यात आली आहे, किंवा आपल्या महानगरपालिका/नगरपालिकेतील NULM कक्षाशी संपर्क साधावा.असे आवाहन लोणावळा नगरपरिषद समाज कल्याण विभागाचे दिलिप गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page