प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातर्फे” फुलोरा” विविध गुणदर्शन संपन्न

प्राधिकरण निगडी -प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दिनांक १० मे २०२६ रोजी “फुलोरा”हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम, निगडी येथील मनोहर वाढोकर सभागृहात संपन्न झाला . वय विसरून अनेक ज्येष्ठांनी महिला उत्कर्ष गीतांवर आधारित नृत्य सादर केले. तसेच एक युगलनृत्यही सादर झाले . परंतु संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे “तेरी भी चूप” हे नाटक ! या नाटकाचे लेखन श्री मुकुंद जोशी यांनी केले होते , तर दिग्दर्शन श्री व सौ वर्टीकर यांनी केले होते . “ती” ही नाटिका सगळ्यांच्या विचारांना जागृत करून गेली. त्याचे लेखन व दिग्दर्शन सौ अर्चना वर्टीकर यांनी केले होते. सर्व कलाकारांचे अभिनय लेखन व दिग्दर्शन सर्वच गोष्टींना रसिकांनी भरभरून दाद दिली .या कार्यक्रमात नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. चंद्रशेखर जोशी यांचा सत्कार करण्यात आला व त्यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. सुरवातीला, “ओम नमोजी आद्या” हे इशस्तवन गाऊन कार्यक्रमांमध्ये मांगल्य निर्माण केले. कार्यक्रमाला माजी उपमहापौर सौ. शैलजाताई मोरे , सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठांचे मानसपुत्र श्री बाळासाहेब शिंदे , डाॅ. श्री माऊली फरांदे हे कार्यक्रमास उपस्थित होते. या “फुलोरा” कार्यक्रमांमध्ये २६ ज्येष्ठ सभासदांनी सहभाग घेतला होता. श्री विश्वास फडणीस व त्यांची नेपथ्य करणारी टीम यांचे काम फार कौतुकास्पद होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वृषाली गुर्जर यांनी केले. यानंतर, हास्य दिनाचे औचित्य साधून, सर्व हास्य संघांनी विविध हास्य प्रकार , विडंबन काव्य व चुटकुले सांगून “हास्य दिन” साजरा केला , ज्यामध्ये १९ सदस्यांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, सौ. ज्योती कानेटकर यांनी केले.संघाचे उपाध्यक्ष श्री. दिलीप गोसावी यांनी आभारप्रदर्शन केले, संघाची प्रार्थना होऊन, या सुखद कार्यक्रमाची सांगता झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page