*ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा यांची बारा ज्योतिर्लिंगांपैकी तीन ज्योतिर्लिंग दर्शन सहल संपन्न*

मावळ मराठा न्युज-लोणावळा,ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळाच्या वतीने श्रावणमासा निमित्ताने धार्मिक सहल आयोजित करण्यात आली होती. बारा ज्योतिर्लिंगांपैकी तीन ज्योतिर्लिंग दर्शन घेतले. दिनांक २९/७/२०२५ रोजी रात्री साडे अकरा वाजता ३२ ज्येष्ठ भाविकाना घेऊन विरंगुळा केंद्रा पासून बस निघाली. ३० जुलै रोजी सकाळी आठ वाजता आंबेजोगाई येथे उतरून स्नान करून नाष्टा करून देवीचे दर्शन घेऊन परळी वैद्यनाथ कडे प्रवास सुरू केला. देव दर्शन झाल्यावर जेवण करून औंढ्यां नागनाथ चे दर्शन घेऊन रात्री माहेश्वरी यात्री निवास येथे मुक्काम केला. ३१ जुलै रोजी सकाळी सहा वाजता घृष्णेश्वर मंदिरा कडे प्रवास सुरू झाला, वाटेत नाष्टा केला. बस मध्ये महिला आणि पुरुष यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरून मस्त नृत्याचा आनंद घेतला. घृष्णेश्वर येथे दर्शन झाल्यावर प्रसाद खाऊन भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. येथे संगीता नाईक यांच्या मुलीने दर्शना साठी मदत केली म्हणून पुष्प गुच्छ देऊन तिचा सत्कार करण्यात आला. इथून पुढे शिर्डी च्या प्रवासाला सुरवात केली सहा वाजता शिर्डी मध्ये पोहचलो. दर्शन घेऊन नऊ वाजता पुढील प्रवासाला निघालो, रात्री जेवण करून लोणावळा कडे निघालो, सकाळी सहा वाजता सगळे सुखरूपपणे पोहचलो. यां सहलीची जबाबदारी अध्यक्ष श्री तिखें सर, खजिनदार श्री चौधरी सर, उपाध्यक्ष मृदुला पाटील, सेक्रेटरी रश्मी शिरस्कर, सौ शारदा आगरवाल, श्री दत्ता लाड, श्री बन्सल, श्री भगवती प्रसाद, आणि वैष्णवी ट्रॅव्हल चे श्री दत्तात्रय दाभने व सौ सुनंदा दाभने आणि सर्व भाविक यांच्या सहकार्याने सहल छान पार पडली, सर्वांनी खुप खुप आनंद घेतला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page