आषाढी वारी ; जेथे जातो तेथे तू माझा सांगाती



मावळ मराठा न्यूज ;- विठ्ठल हरवूनच देत नाही तुम्हांला जर तुम्ही त्याला त्याच्या स्वाधीन केलेत तर…..मग तो संसार असो वा परमार्थ…विठ्ठल कोणत्याही रुपात येईल,तुम्हांला योग्य मार्गावर आणून सोडेल,वाट दाखवेल…तुम्हांला विठ्ठलाच्या अस्तित्वाची जाणीव होण्यापूर्वी विठ्ठल तिथून हळूवारपणे निघून गेलेला असेल.तुम्हांला त्याचे अस्तित्व असेच जाणवते,जेव्हा तुम्ही संकटात असता……कोणत्या न कोणत्या रुपात,स्वरुपात विठ्ठल तुम्हांला त्यातून सुखरुप बाहेर काढतोच.त्यासाठी हवा फक्त त्याच्यावर विश्वास व आपला श्वासात त्याचे नित्य स्मरण….सुखाच्या वेळीही विठ्ठल असतोच…. किंबहुना विठ्ठल असेल तरच सुख आहे.वारकरी संप्रदायात लाखो वारकऱ्यांना यांची अनुभूती येते.बीस साल पहले,इसी मेले में मैने तुम्हे खोया था…..असली वाक्यं तुम्हांला वारीबाबत कधीही ऐकायला,वाचायला मिळणार नाहीत.संकर्षण कऱ्हाडे ने एक अनुभव सांगितला.त्यांच्या वडिलांना आलेला….८० वर्षांची आज्जी वारीच्या गर्दीत चुकते…नातू शोधतोय…एका थकलेल्या क्षणी तो विठ्ठल मंदिर कळसाला हात जोडतो……क्षणभरच उभा राहतो…..पुढच्या अर्ध्या तासात आज्जीच्या हात धरून परत त्याच ठिकाणी दोघेही कळसाचे दर्शन घेत असतात.संकर्षण सांगत होता आणि सांगणाऱ्याचे नि ऐकणार्यांचे डोळे पाणावले होते त्याच्याबद्दल च्या कृतज्ञतेने……हो फक्त आणि फक्त कृतज्ञताच…..विठ्ठल… विठ्ठल… विठ्ठल




