वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे वतीने राष्ट्र पुरुषांची संयुक्तपणे जयंती साजरी



मावळ मराठा न्युज – वडगांव,वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन चे वतीने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भगवान महावीर,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आदी महापुरुषाची संयुक्त जयंती साजरी करणेत आली. यावेळी ॲड नामदेवराव दाभाडे, ॲड अजय शहा, ॲड दीपाली जाधव, ॲड सागर शेटे आदींनी महापुरुशांप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्याप्रमाणे सर्वांनी आचरण करावे, समता, बंधुता, धर्मानिरपेक्षता आचरणात आणावी अशा भावना सर्वांनी व्यक्त केल्या.यावेळी वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन चे अध्यक्ष ॲड सोमनाथ पवळे, सचिव ॲड अक्षय रौंधळ, ॲड दिपक चौधरी, ॲड दिलीप पंडीत, ॲड सुबोध कालेकर, ॲड धनंजय कोद्रे, ॲड मच्छिंद्र पंडीत,ॲड अजित वहिले, ॲड प्रदीप धोकर ॲड मुनाफ शेख, ॲड सागर शेटे आदी वकीलवर्ग उपस्थित होता.




