ग्रामीण भागात टॅबद्वारे शिक्षण म्हणजे शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारक पाऊल- वैशाली वरणेकर



मावळ मराठा न्यूज :-संपर्कच्या शाळेत विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आले मंगळवार दिनांक २८/२/२०२३ रोजी संपर्क ग्रामीण विद्या विकास केंद्र भांबर्डे तालुका-मुळशी जिल्हा-पुणे येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे विजडम व जेंडामार्क इंडिया प्रा. लि. कंपनीने इयत्ता आठवीच्या ३८ विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधायुक्त नवीन टॅब वाटप करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ पुणे विजडम कडून प्रेसिडेंट वैशाली वरणेकर, माजी. प्रेसिडेंट रोटरियन हेमंत पुराणिक,प्रोजेक्ट डायरेक्टर रोटरियन उमेश पाथरकर, रोटरियन राजेश वाडेकर,जेंडामार्क इंडिया प्रा. लि. कंपनी कडून कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.हिमांशू जाधव, डिजिटल विभाग प्रमुख श्री निशिकांत जंगम, कंपनीची मार्केटींग व ओडिन एज्युकेशनची टिम इत्यादी,संपर्क संस्थेचे संस्थापक मा.श्री अमित कुमार बॅनर्जी,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनुज सिंग,भांबर्डे गावचे माजी सरपंच श्री जयरामजी दिघे,बारपे गावचे विद्यमान सरपंच श्री संतोष कदम, केंद्रप्रमुख श्री दत्तात्रय गोरे उपस्थित होते. “आजच्या आधुनिक व स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी कोठेही मागे राहू नये.जगातील इतर विद्यार्थ्याबरोबर त्यांनी स्पर्धा करावी. अध्ययन अध्यापनात त्यामुळे गती येईल.असे संस्थेचे संस्थापक श्री अमित कुमार बॅनर्जी यांनी आपल्या भाषणातून सांगितले. रोटरी क्लब ऑफ पुणे विजडम व जेंडामार्क इंडिया प्रा. लि. कंपनी मनापासून त्यांनी आभार मानले.””या शैक्षणिक टॅब चा उपयोग करून विद्यार्थ्यांनीआपले करिअर घडवावे.ग्रामीण भागात टॅब द्वारे शिक्षण म्हणजे शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारक पाऊल ठरेल.असे प्रेसिडेंट वैशाली वरणेकर, आहे यांनी सांगितले.””डिजिटल लर्निंग क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थी उपेक्षित राहू नये.शहरी भागातील मुलांच्या तोडीस तोड गुणवत्ता वाढ होण्याकरिता शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने टॅब वाटप करण्यात येईल.असे आश्वासन जेंडामार्क इंडिया प्रा. लि. कंपनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.हिमांशू जाधव यांनी दिले.”डिजिटल विभाग प्रमुख निशिकांत जंगम यांनी टॅब वापराबाबत प्रात्यक्षिक मुलांना व शिक्षकांना दिले. अद्यावत शैक्षणिक टॅब मिळाल्याने विद्यार्थी आनंदी झाले आहेत. दुर्गम भागातील शाळेची निवड केल्याबद्दल सर्व कर्मचारीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.यासाठी जनसंपर्क अधिकारी हिरामण कोकणे सरांनी पाठपुरावा व अथक प्रयत्न केले. रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेऊन त्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली. तसेच आठवी ते दहावीच्या मुलांना स्टेज डेरिंगबाबत प्रेसिडेंट वैशाली वरणेकर, नी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण मा.श्री अमित कुमार बॅनर्जींनी केले.सर्वांचे स्वागत श्री.दत्तात्रय चाळक प्राचार्य यांनी केले.तर सर्वांचे आभार श्री.हिरामण कोकणे सरांनी मानले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री रफिक पठाण सरांनी केले.




