टाकवे बुद्रुक येथे ढोल ताशा गुलालाची उधळण करत पोळा मोठ्या उत्साहात साजरा




मावळ मराठा न्युज :- मावळ,टाकवे बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाला घरी गरम पाण्यानी अंघोळ घालून त्यांना शिंगाना सोनेरी, फुलांचे हार घातले, मोरखी,कवड्याच्या माळा, रंगीबेरंगी गोंडे, गुंगर माळ, चवराचे गोंडे घालून पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला. गावातील शेतकऱ्यांनी डीजे, ढोल ताशे, बॅण्ड तुताऱ्या तसेच, गुलाल भंडाऱ्याची उधळण करत आपापल्या बैलांची मिरवणूक काढत ग्रामदेवताचे दर्शन घेतले. बैलांना शिंगाला कपाळावरती नारळ बांधून गावातील ऐशी मधून पळवले ह्या बैलांच्या कपाळावरील नारळ तोडण्यासाठी युवक मोठ्या प्रमाणावर ऐशी मध्ये उभे राहून नारळ तोडण्यासाठी आपले साहस दाखवत होते. तर अनेक सर्जा राजांनी त्यांच्या कपाळावरती बांधलेले नारळ तोडून दिले नाही. अशाप्रकारे टाकवे बुद्रुक सह आंदर मावळ मधील ४० ते ५० गावात मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला. बैलाच्या कपाळावरील नारळ तोडणाऱ्यांसाठी विशेष बक्षीस होते. सुरेश गणपत असवले यांच्या बैलाचा नारळ तोडणाऱ्यांसाठी ५१ ,१११ रुपये. ऋषीनाथ पांडुरंग शिंदे यांच्या बैलाचा नारळ तोडणाऱ्यांसाठी ११ ,१११ रुपये. संतोष गबळू पिंगळे यांच्या बैलाचा नारळ तोडणाऱ्यांसाठी तोच बैल व त्या सहित दुसरा एक बैल असे दोन बैल या शेतकऱ्यांकडून अशी वेगवेगळी बक्षीसे ठेवण्यात आली होती.




