संपर्क बचत गट महिलांची अभिनव सह.पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शुभांगी केदारी तर उपाध्यक्षपदी निकिता आंबेकर यांची बिनविरोध निवड





मावळ मराठा न्युज-मळवली,सहायक निबंधक वडगाव मावळचे निवडणूक अधिकारी वंदना तळपे यांच्या उपस्तिथीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध होत अध्यक्षपदि शुभांगी संतोष केदारी यांची तर उपाध्यक्षपदी निकिता सीताराम आंबेकर यांची निवड करण्यात आली. संपर्क संस्थेच्या मलवली केंद्रात गेली अनेक वर्षे बचत गटाच्या महिलांची पतसंस्था कार्यान्वित आहे महिला सबलिकरनाच्या उद्देशाने संपर्क चे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पतसंस्था सुरु असून आसपासच्या गावातील हजारो महिला पतसंस्थेत सभासद आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षाचे स्वागत संपर्क चे सचिव अमितकुमार बॅनर्जी यांनी केले निवडणूक प्रक्रियेला संपर्क चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज सिंग निवडणूक अधिकारी वंदना तलपे उपस्थित होते. नवीन कार्यकारिणी मध्ये सचिव पदी बेबीताई हुळावले, खजिनदारपदी सुनीता घारे, संचालक पदी मंदा वाळुंजकर नर्मदा भोरडे, प्रांजल ससाने, सुजाता केदारी, कांताताई काटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी संपर्क चे सचिव अमितकुमार बॅनर्जी यांनी उपस्थित नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन केले.




