*लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयाच्या २५ गरजू विद्यार्थ्यांना ट्रस्ट ग्रुपच्या वतीने सायकली भेट,पंचतारांकित पाहुणचाराने विद्यार्थी भारवले*

मावळ मराठा न्यूज -लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयाच्या २५ गरजू विद्यार्थ्यांना ट्रस्ट ग्रुपच्या वतीने कर्जत येथील रेडिशन ब्ल्यू प्लाझा या ठिकाणी २५ मोफत सायकली देण्यात आल्या. पंचतारांकित अशा कार्यक्रमात देण्यात आलेल्या या सायकलसारख्या भेट व पाहुणचारामुळे विद्यार्थी खूप भारावून गेले.याप्रसंगी ट्रस्ट ग्रुपचे फाऊंडर व मेंटॉर श्री. उत्पल शेठ व डायरेक्टर श्रीमती निपा शेठ यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.बलकवडे सर यांचा विशेष सन्मान सत्कार केला. या प्रसंगी ट्रस्ट ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी गरजू विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचविणे हे आमचे कायम ध्येय राहील असे व्यक्त केले. गरजू विद्यार्थ्यांना सायकली मिळविण्यात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बलकवडे सर यांच्याबरोबर श्री. पारीठे सर, श्री. पठाण सर व आदित्य बलकवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page