कुंडमळ्याजवळील साकोव लोखंडी पूल कोसळला सहा जण वाहून गेल्याची भीती





मावळ मराठा न्युज -इंदोरी, मावळ तालुक्यातील कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील साकोव पूल आज अचानक कोसळल्याने. या घटनेत पूलावरून प्रवास करत असलेल्या २० ते २५ जण नदीच्या प्रवाहात पडून काही पाच ते सहा जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी मावळातील शिवदुर्ग रेस्क्यूव आणि इतर बचाव पथक दाखल झाले असून स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांचे शोधकार्य सुरू आहे. या घटनेत नक्की किती जण वाहून गेले याबद्दल आता तरी नक्की काही सांगता येऊ शकत नाही शोध कार्य युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे. साकोव पूल अचानक कोसळल्याने कुंदमळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




