लोणावळ्यात गोमांस पॅकेट बेकायदेशीररित्या हैद्राबादहुन मुंबईला घेऊन जाणाऱ्या चालकासह ४ जणावर गुन्हे दाखल

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,दिनांक १६/०४/२०२४ रोजी दुपारी १३:४५ वा. चे सुमारास कुमार चौक लोणावळा येथे कर्तव्यावर असताना ओमकार सुधिर शिर्के रा. गवळीवाडा लोणावळा व त्याचे सोबतचे तीन इसम यांचेकडुन मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने मिळुन आले ट्रक नं टी. जी. ड टी ०२५९ वरील चालक नामे महंमद इकबाल महंमद इब्राहिम कादरी वय ५१ वर्षे रा. १८ -१३ -८ /१६० /३० , रहिमत कॉलनी, पुर्व बंदलगुडा, हैद्राबाद राज्य तेलंगना येथुन बरकत टॅम्पो सर्विस लकडराम रोड इसनापुर जि. संगारेड्डी राज्य तेलंगना येथील दस्तगीर (पुर्ण नाव माहित नाही) याचे सांगणेवरून हैद्राबाद येथील राजीव गांधी एअरपोर्ट च्या शेजारी असले पहाडी शरीफ येथे असलेल्या एका गोडावुन मधुन गोमांस पॅकेट घेवुन बेकायदेशीररित्या गोमांस स्वतःचे टॅम्पोमध्ये बाळगुन शफीक महम्मद कुरेशी रा. कुर्ला ईस्ट कुरेशीनगर मुंबई यांना देण्यासाठी वाहतुक करताना मिळुन आल्याने माझी १) महंमद इकबाल महंमद इब्राहिम कादरी २) शफीक महम्मद कुरेशी ३) बरकत टॅम्पो सर्विस लकडराम रोड इसनापुर जि. संगारेड्डी राज्य तेलंगना येथील दस्तगीर (पुर्ण नाव माहित नाही) ४) गोडावुन चालक यांचे विरूध्द महाराश्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम ५ (क) (ड), ९ (अ) (ब) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे. वगैरे मजकुराचे तक्रारीवरुन गुन्हा रजिस्टरी दाखल करुन मा. हुजुर कोर्ट सो यांना गुन्ह्याचा प्रथम वर्दि रिपोर्ट खाना करुन दाखल गुन्ह्याचा पुढिल तपास लोणावळा शहर पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई पाटील हे करीत आहे. दाखल अंमलदार पो हवा/२१२३ म्हेत्रे

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page