रविवार निमित्त अजित फाउंडेशनमध्ये मुलांसाठी स्पर्धेचे आयोजन
मावळ मराठा न्यूज, तळेगांव:-अजित फाऊंडेशन संस्थेतील विविध प्रकल्पातील मुलांची स्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. त्यात उत्स्फूर्त सहभाग, जेवणाची पंगत, बक्षिसं आणि वितरण कार्यक्रमासाठी खास श्री. सचिदानंद कुलकर्णी, अदितीताई निलंगेकर यांची उपस्थिती. सकाळ पासून मुलांची लगबग सुरु होती. ग्रीन सिग्नल स्कुलचे मुलं दर रविवारी सृजनालयात येतात. आज जरा नियोजन वेगळं होतं, स्पर्धेबरोबर बाल सवंगड्याना चिमुकल्या हातांनी जेवणाची मेजवानी द्यायचं ठरलं, तसा ठराव बालसभेत मंजूर झाला. मेनू काय असणार यावर चर्चा झाली,

गिरीषदादा, श्रीकांतदादा यांचेशी बोलणी झाली, चर्चेचे कारण तसंच होतं, त्यांच्या मदतीशिवाय हे शिवधनुष्य पेलणार नव्हतं. पहा बरं मुलं हुशार आहेत ना? चिमुकले हात लुडबुड करणं, बघतच राहावं वाटत. यामध्ये मुलींना कौशल्य सहजच फुलत जाणार आहे, त्यास वेगळा हट्टाहास करण्याची गरज नाही. कारण तुम्हाला जेवण कसं बनवायचं हे शिकवलं जाणार आहे? असं म्हंटल की ते निरस, नकोसं वाटू लागतं. यापेक्षा तुमच्या बालमित्रांना आपण भारी जेवणाची मेजवानी देऊयात असं कानी पडताच हात आपसूक तयारीला लागले. स्पर्धाही छान झाली. स्पर्धेकांना प्रोत्साहनपर बक्षिसं दिली. भटक्या समूहातील मुलं प्रवाहात सामील होत आहेत, बदलाची नांदी झालीय, प्रवास सुरूच असणारा आहे. खरं तर तुम्हा सर्वांमुळे शक्य आहे, कारण मदत अन् सोबत आपली आहे, आपलेपणाची..!