ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळास रोटरी क्लब तळेगाव सिटी तर्फे शुद्ध वॉटर कुलर लोकार्पण




मावळ मराठा न्यूज:- तळेगांव,सामाजिक दायित्व या भावनेतून रोटरियन प्रदीप व त्यांचे बंधू मोरेश्वर यांनी आपले वडील कै नारायण मुंगसे यांच्या स्मरणार्थ अत्यंत आधुनिक वॉटर कुलर ज्येष्ठ नागरिक संघाच्या लायन डॉक्टर विजया भंडारी- दादा दादी पार्क येथे आज पासून – उपलब्ध करून दिला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुधाकर रेम्बोटकर यांनी रोटरी क्लबचे पदाधिकारी आणि उपस्थितांच मनःपूर्वक स्वागत केलं! संस्थेला हे वॉटरकुलर उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली. अत्यंत कुशल कर्मयोगी रोटेरियन अध्यक्ष दिपक फल्ले आणि प्रदीप मुंगसे या उभयतांनीही ज्येष्ठांच्या सेवेची संधी आम्हाला दिली हे- आम्ही आमच भाग्य समजतो असं आपल्या मनोगतात व्यक्त केलं. संघाचे उपाध्यक्ष-डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी रोटरीने आयोजित केलेला हा उपक्रम पाहणाऱ्याला अगदी छोटा वाटत असला तरी तो- संवेदनशील समाजाला संदेश देणारा निश्चितच ठरेल असे आपले मनोगत व्यक्त केले.वॉटरकुलरचे उद्घघाटक २०२४ -२५ चे रोटरीचे प्रांतपाल शितल शहा यांनी रोटरीक्लब तळेगाव सिटीचे अध्यक्ष दीपक फल्ले आणि सर्व पदाधिकाऱ्यांच मनापासून कौतुक आणि अभिनंदन केलं. इथून जाताना या क्लबच्या विविध उपक्रमातून मी एक कार्यक्षमतेची ऊर्जा घेऊन जात आहे हे मात्र त्यांनी प्रांजलपणे कबूल केलं.माजी नगराध्यक्ष श्रीमती मीराताई फल्ले आणि विठ्ठल कांबळे या दोघांनीही या अत्यंत उपयुक्त अशा रोटरीच्या उपक्रमाबद्दल संस्थेतर्फे कृतज्ञता व्यक्त केली. अल्पोपहाराच्या आस्वादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




