प्रलंबित प्रादेशिक योजनांची त्वरित पूर्तता करा अन्यथा ठेकेदाराना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश – आमदार सुनील शेळके



मावळ मराठा न्यूज़, मुंबई ;- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत येत असलेल्या मावळ तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठक सदस्य सचिव श्री.अभिषेक कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात नुकतीच संपन्न झाली. मावळ तालुक्यातील कामशेत-खडकाळा, डोणे-आढले, कार्ला,पाटण, कुसगाव-डोंगरगाव, वराळे या प्रादेशिक योजनांची सद्यस्थिती प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडली.या योजना पुर्ण करण्यासाठी अनेक वेळा बैठका घेण्यात आल्या आहेत.परंतु कामांना गती मिळत नाही.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या सर्व योजना पुर्ण करणे आवश्यक आहे. वनविभागाच्या काही अडचणी असतील तर त्याचा पाठपुरावा करुन मार्ग काढावा.सर्व योजना लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. दिलेल्या कालावधीत जर योजना पूर्ण झाल्या नाहीत तर संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत. या बैठकीस माझ्यासमवेत, गटविकास अधिकारी श्री.सुधीर भागवत, मुख्य अभियंता पुणे श्री.राजेश रहाणे, शाखा अभियंता श्री.राजेश कुलकर्णी, कार्यकारी अभियंता श्री.पी.सी.भांडेकर, अधिक्षक अभियंता सौ.वैशाली आवटे तसेच पंचायत समित सदस्य संतोष राऊत ,मा. उपसरपंच प्रवीण साळवे,ग्रामपंचायत सदस्य नितीन सखाराम मोरे,प्रदिप कोकरे ,विशाल तिडके ,संगीता गायकवाड ,सुवर्णा भोसले,संजय गुंड ,आणि ठेकेदार आदि.मान्यवर उपस्थित होते.




