महाराष्ट्र अण्ड गोवा नोटरी असोसिएशनच्या ऍड.अभिजीत जांभुळकर यांची मावळ तालुका अध्यक्षपदी निवड







मावळ मराठा न्युज -पुणे, ता. ६०: महाराष्ट्र अण्ड गोवा नोटरी असोसिएशनच्या मावळ तालुका अध्यक्षपदी ऍड.. अभिजीत जांभुळकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. आणि प्रदेशाध्यक्ष ऍड. सय्यद सिकंदर अली यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली.ऍड. जांभुळकर हे गेली १८ वर्षे विधी व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक व कायदाक्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन राज्य अध्यक्ष अँड सय्यद सिकंदर अली साहेब, कार्याध्यक्ष ऍड. यशवंत खराडे, सचिव ऍड. प्रवीण नलावडे तसेच प्रवक्ता ऍड. अतिश लांडगे यांनी नियुक्ती केली व त्यांची ही निवड झाली आहे. सदर नियुक्ती प्रमाणपत्र महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष मा. श्री अण्णा साहेब बनसोडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. पायेळी अॅड विनकर बारणे प्रदेश सवस्य, अँड शंकरराव वानखेडे प्रदेश प्रवक्ता, ऍड. वैभव कर्वे अध्यक्ष खेड बकील संघटना, ज्येष्ठविधीज्ञ ऍड. मयूर लोढा,ऍड. सचिन विलासराय नवले, ऍड. गणेश जगताप, ऍड. प्रताप मेरूकर ऍड. योगेश थंबा, ऍड. गुरुप्रसाद शिनलकर, ऍड. तेजस्विनी परमाने पवार हे उपस्थित होते.




