शिवजन्मोत्सव ठोंबरे वाडी लोणावळा २०२३ उत्साहात साजरा




मावळ मराठा न्यूज :- लोणावळा, सालाबादप्रमाणे यंदाही तीथीनुसार शिवजयंती उत्सव ठोंबरे वाडी येथे युवा कार्यकर्त्यांची माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली..दरवर्षी प्रमाणे शिवज्योत किल्ले रायगड ते ठोंबरेवाडी येथुन १२३-१२५ कि.मी. चे अंतर पार करून ठोंबरेवाडीतील १८-२० वयोगटातील तरूणांनी स्वतः जबाबदारी घेऊन शिवज्योत पळवत आणली.शिवज्योत चे आगमन ठोंबरे वाडी येथे झाल्यानंतर महाराजांचा यथोचीत पुजा विधी करण्यात आलातसेच पुर्व नियोजीत कार्यक्रमानुसार दुपारच्या सत्रात स्थानिक लहान मुलांसाठी तसेच युवकांसाठी वकृत्व स्पर्धा,वेषभुषा स्पर्धा,चित्रकला स्पर्धा तसेच एकांकिका सादर करण्यात आली यामध्ये ठोंबरेवाडीतील लहान मुले व तरूणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व आपले कलाकौशल्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांची वाह-वाह मिळवली.सातारा येथील प्रा.उमेश.सुर्यवंशी यांचे शिवव्यख्यान झाले.यानंतर वेषभूषा,चित्रकला व वकृत्व स्पर्धेचा परीतोषीक वितरण समारंभ पार पडला. शिवजयंती चे मुख्य आकर्षण म्हणजेच शिवजयंती मिरवणूक श्रींची मिरवणूक ख़ंडोबा ढोल ताशा पथक यांच्या वाद्यनादात ढोल ताश्यांच्या गजरात ठोंबरेवाडीत काढण्यात आली यावेळी महिला मंडळ तसेच ठोंबरे वाडीतील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी मीरवनुकीत सहभागी झालेले महिला मंडळ व ठोंबरे वाडीतील सर्व ग्रामस्थ यांनी जेवनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..विविध स्पर्धेतील सर्व क्रमांक पुढीलप्रमाणेशिवजन्मोत्सव कमिटी ठोंबरेवाडीशिवजयंतीनिमित्त आयोजकांकडुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यातवकृत्व स्पर्धा मोठा गटप्रथम क्रमांक – सुजल सुतारव्दीतीय क्रमांक – साक्षी जाधवतृतीय क्रमांक – ओमकार ठुलेपारंपारिक वेषभुषा स्पर्धालहान गटप्रथम क्रमांक – तन्मय ठोंबरेव्दीतीय क्रमांक – आदिती शिंदेतृतीय क्रमांक – आरोही हुंडारेपारंपारिक वेषभुषा स्पर्धामोठा गटप्रथम क्रमांक – आदिती कदमव्दीतीय क्रमांक – संकष्टी गाडेतृतीय क्रमांक – पद्मश्री कदमचित्रकला स्पर्धालहान गटप्रथम क्रमांक – काव्या भिलारेव्दीतीय क्रमांक – विधिता वालकेतृतीय क्रमांक – सई गायकवाडचित्रकला स्पर्धामोठा गटप्रथम क्रमांक – सुयश चव्हाणव्दीतीय क्रमांक – छगन पथाडीयातृतीय क्रमांक – ओम दाभाडे कार्यक्रमाचे मुख्य आयोजन श्री शाम सुतार,लक्ष्मण दाभाडे, रोहित खरपासे, सोमनाथ ठोंबरे, संतोष मेणे,अमोल शिंदे ,मोहन सुतार,कल्पेश ठोंबरे,गोरक्ष मेणे,विनोद पेशकर,राजु साठे, सुधीर साठे,विक्रांत साठे,नरेश खांडभोर,आनिल कदम,राजकुमार केंद्रे यांनी केले.दिपक हुंडारे,विलास ढम,लक्ष्मण कार्तुडे,सचिन शिंदे,राकेश ठोंबरे,सुनिल इंगुळकर,विशाल पोटफोडे,सुनिल साठे,नितिन जगताप,सागर शिंदे,सनी जाधव,मंगेश भिलारे,संतोष खांडभोर,शुभम दाभाडे,अविनाश गायकवाड,महेश यादव,ओमकार सुतार,निरज मेने,सुजल सुतार,अजय धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.




