वीज वितरण,लोणावळा यांनी आपला कारभार सुधारावा- लोणावळा शहर शिवसेनाचा इशारा







मावळ मराठा न्यूज -लोणावळा, लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने आज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लोणावळा शहर कार्यालयातील कनिष्ठ अभियंता श्री अरगडे यांना लोणावळा शहरातील विद्युत वितरण कंपनीच्या संदर्भात विविध नागरी प्रश्न व समस्या या विषयी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.शहरातील रोज दिवसभरात खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, भूमिगत केबलचा प्रश्न लवकरत लवकर मार्गी लावण्यात यावा, रात्रीच्या वेळी विजेसंदर्भात काही तक्रार असल्यास रात्रीच्या वेळेस कर्मचारी नेमण्यात यावेत, शहरातील काही ठिकाणी वीज पुरवठा कमी दाबाने होत असल्याने त्याठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावेत, वीज बिल भरण्यास उशीर झाल्यास वीज कर्मचारी यांची नागरिकांसोबत अरेरावी करणे आदी नागरी प्रश्न व समस्या विद्युत वितरण कंपनी यांनी महिन्याभरात मार्गी लावावेत अन्यथा आपल्या विरोधात जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना शहरप्रमुख संजय भोईर यांनी वीज वितरण कंपनी चे कनिष्ठ अभियंता यांना दिला आहे.यावेळी शहरप्रमुख संजय भोईर, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, उपशहर प्रमुख विजय आखाडे, शहर समन्व्यक नंदू कडू, युवासेना शहर अध्यक्ष विवेक भांगरे, महिला आघाडी शहर संघटिका मनिषा भांगरे, उपशहर संघटिका अनिता गायकवाड, उपशहर संघटिका दिपाली शिरंबेकर, विभागप्रमुख प्रसाद कन्नन, उपविभाग प्रमुख नरेश घोलप आदी पदाधिकारी उपस्थित होते.




