बस स्थानकात परवानाधारक हॉकर्स यांना जागा मिळावी यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांना निवेदन

मावळ मराठा न्युज -लोणावळ्यातील नियोजित बस स्थानकात परवानाधारक हॉकर्स यांना हक्काची जागा मिळावी याबाबत भरत चिकणे यांनी घेतली मावळचे आमदार शेळके यांची भेट घेतली आहे.लोणावळा,एस टी महामंडळ लोणावळा बसस्थानक अद‌यावत करणार आहेत. हे करित असताना येथील छोट्या व्यापाऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये. असे निवेदन लोणावळा येथील सामाजिक कार्यकर्ते भरत चिकणे यांनी मावळ चे आमदार सुनील शेळके यांना दिले आहे. बसस्थानक नवीन बाधताना त्याचे कान्ट्रेक्ट न देता. ते एस टी महामंडळाने बांधावे. आणि ते बांधत असताना त्यात परवाना धारकाचा व्यवसाय साठी बाजूला थोडी जागा. दयावी. सर्व बसेस रोज त्या ठिकाणी आल्या पाहिजेत. जेणेकरून स्थानिकाना रोजगार मिळेल.नवीन बस स्थानक तयार झाल्यानंतर सर्व परवाना धारकाना पूर्वी प्रमाणे जागा दयावी. कारण सर्वांची उपजीवीका, लोणावळा बसस्थानका वर गेली वीस ते पंचवीस वर्षे अवलंबून आहे. त्यामुळे मावळ तालुक्याचे प्रथम नागरीक म्हणून मावळचे आमदार सुनील शेळके यांनी त्यांचे कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी घ्यावी व .त्या संदर्भात योग्य निर्णय घेऊन जातीने लक्ष द्यावे आणि लोणावळा बस स्थानकातील बसस्थानक परवानाधारक / हॉकर्स जे वर्षेनी वर्षे उपजीविका करत आहेत त्या छोट्या व्यापाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती भरत चिकणे यांनी निवेदनद्वारे केली आहे.यावेळी श्री.भारत रमेश चिकणे श्री.अनिल आल्हाट श्री.रुपेश कुंभार श्री.योगेश कदम श्री.प्रशांत वैद्य,श्री.विनोद इंगळे,श्री.संजय चव्हाण,श्री.राजू मुळे,श्री.धनराज बोरुळे,श्री.राहुल शिंदे,श्री.सोमनाथ थोरवे,श्री.गणेश अंबादास गवळी आदी परवानाधारक उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page