बदलापूर येथील घटनेच्या निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” पक्ष लोणावळा शहराच्यावतीने पोलिसांना निवेदन

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,बदलापूर येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” पक्ष लोणावळा शहराच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.असा प्रकार लोणावळा शहरामध्ये घडु नये त्या संदर्भात लोणावळा शहर पोलीस स्टेशनला लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले.अशी घटना लोणावळा शहरामध्ये घडणार नाही याची दक्षता घेण्यात येईल अशी ग्वाही पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिली.यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी पुणे जिल्हा सहसंपर्क संघटिका व विरोधी पक्षनेत्या श्रीमती शादान चौधरी,शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे,शहरप्रमुख बाळासाहेब फाटक,मावळ तालुका सल्लागार प्रमुख मारूती खोले,उपशहरप्रमुख नरेश काळवीट,अवजड वहातुकसेना पुणे जिल्हा अध्यक्ष पंकज खोले,लोणावळा शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे,लोणावळा शहर प्रवक्ते अनिल कडु, विभागप्रमुख संजय शिंदे,महिला आघाडी उपशहर संघटिका प्रतिभा कालेकर,विभाग संघटिका शोभाताई चव्हाण,शाखासंघटिका उर्मिला शर्मा,विभाग समन्वयक गणेश फरांदे,शाखाप्रमुख संजय जाधव,रोमल फर्नांडिस,कुणाल सपकाळ,सुमित भोसले आदी पदाधिकारी व शिवसैनिक व महिला आघाडी मोठ्या संखेने यावेळी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page