कासारसाई धरणावर फिरायला आलेल्या १९ वर्षीय संतोष राऊत याचा मृतदेह बाहेर काढन्यात वन्यजीव आणि शिवदुर्ग टीमला यश






मावळ मराठा न्युज -मावळ,वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग रेस्क्यू लोणावळा यात निलेश गराडे,सुनिल गायकवाड, महेश मसने,राजेंद्र कडू,आकाश मोरे, अनिल आंद्रे,शुभम काकडे, विनय सावंत, अनिश गराडे,विकास दोड्डी, हर्षद काळोखे,योगेश दळवी,अजय हुगे यात आपला सहभाग नोंदवला.मयत मुलाचे नाव संतोष शहाजी राऊत वय १९, राहणार साने कॉलनी चिखली मूळगाव मालेगाव ता.केज,बीड असे आहे.कासारसाई डँम मध्ये काल एक मुलगा बुडाला होता. काल ११ वाजता बुडाला होता आज साडे अकरा वाजता बाँडी त्याची मिळाली आहे. मित्र मित्र असे पाच जण कासारसाई डॅम वर फिरायला आले होते.




