लोणावळा नगरपरिषदच्या वतीने “स्वच्छोत्सव रॅली २०२३ “आणि स्वच्छ मशाल मोर्चा चे आयोजन


मावळ मराठा न्यूज:-लोणावळा नगरपरिषद स्वच्छ्ता अभियानात देशात आघाडीवर असल्याने दुसऱ्या क्रमांक वरून आता प्रथम क्रमांक साठी कंबर कसली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेने केंद्र शासनाचे सुचनेनुसार दिनांक २९/३/२०२३ रोजी सकाळी ९ .३० ते ११ .३० या वेळेत “स्वच्छोत्सव रॅली २०२३ ” चे आयोजन केले. यामध्ये स्वच्छ मशाल मोर्चा घेण्यात आला. यावेळी प्रथमतः सर्व मॅकडोनाल्ड जवळील मोकळया जागेत जमा होवून सर्वानी स्वच्छतेची शपथ घेतली. त्यानंतर मावळा पुतळा-जयचंद चौक-छत्रपती शिवाजी चौक – नगरपरिषद कार्यालय या मार्गाने स्वच्छ मशाल मोर्चा काढणेत आला. या मोर्चात महिलांनी मशाल बरोबर घेवून जनजागृती फलक व घोषणा देवून शहरात जनजागृती केली. यामध्ये प्लास्टीक बंदी, कचरा वर्गीकरण,उघडयावर कचरा टाकू नये अश्या घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमात SBM आणि DAY NULM अंतर्गत बचत गटाच्या महिला नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, महालक्ष्मी महिला मंच, माजी नगराध्यक्षा श्रीमती. सुरेखा नं.जाधव व माजी नगराध्यक्षा उषाताई चौधरी, पत्रकार,नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळेस उपस्थित सर्व महिलांना कापडी पिशवी व सॅनिटरी नॅपकीनचे वितरण करण्यात आले. लोणावळा नगरपरिषदेने मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी स्वच्छ मशाल मोर्चात उपस्थित राहीले बद्दल सर्वाचे आभार मानले व शहरात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणेबाबत व १०० टक्के कचरा वर्गीकरण देणेबाबत उपस्थितांना आवाहन केले.




