विधी विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना देशप्रेम,राष्ट्रीय एकात्मता,सहिष्णुता,सामाजिक बांधिलकीसाठी महत्वाची!


मावळ मराठा न्युज :-पिंपरी, (प्रदीप गांधलीकर)दिनांक : ०५ फेब्रुवारी २०२४सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत “युवकांचा ध्यास, ग्राम-शहर विकास” या उपक्रमांतर्गत विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर पिंपरी – चिंचवड परिसरातील जांबे गावात सुभद्रा एज्युकेशन सोसायटीचे ‘एस.एन.बी.पी विधी महाविद्यालय’ द्वारा रविवार, दिनांक ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात उपस्थित राहत विधी विद्यार्थ्यांना /नवोदित वकिलांना Professional Ethics /व्यावसायिक नैतिकता त्याचबरोबर विधी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असणारे अभिरूप न्यायालय स्पर्धा आणि त्याचे महत्त्व सांगण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे, हे तर आहेच पण त्याचबरोबर भावी वकील म्हणून ज्येष्ठ वकिलांच्या कामाचा आदर्श नव्या पिढीने घेऊन विद्यार्थिदशेतच मुलांनी आपली नैतिक मूल्ये जोपासत सामाजिक बांधिलकीतून वकिली क्षेत्राची प्रतिष्ठा वाढविण्यासंदर्भात ॲड. मंगेश खराबे यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे पुणे लॉयर्स सोसायटीचे सेक्रेटरी ॲड. अतिश लांडगे यांनी विद्यार्थ्यांना फौजदारी कायदा (जामीन व सुटका) या संदर्भात मार्गदर्शन केले; तर पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांनी दिवाणी कायदा व प्रॅक्टिस संदर्भात विधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी या शिबिरासाठी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे उपस्थित होते. सदर शिबिरात जांबे गावचे पोलीसपाटील तसेच पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी सचिव ॲड. महेश टेमगिरे आणि एस.एन.बी.पी विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून उपस्थित मान्यवरांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला. या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून राज्यशास्त्र विषयाचे साहाय्यक प्राध्यापक विजयदीप मुंजनकर यांनी आपले योगदान दिले.