*सोमाटणे टोल नाका अन्यत्र हलवा मनसेची मागणी*

मावळ मराठा न्युज -तळेगाव,काही दिवसापूर्वी सोमटणे टोल नाका अधिकृत की अनधिकृत यासंदर्भात तळेगाव पोलीस स्टेशन येथे मीटिंग झाली होती त्यामध्ये एमएसआरडीसी आणि आय आर बी या दोन्ही कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते सोमटणे टोलनाका हा अनधिकृत आहे त्यामुळे सोमटने टोल येथून हटवावा व त्याच्या अधिकृत जागेवरती घेऊन जावा यासंदर्भात कोणतेही प्रतिक्रिया न आल्यामुळे आज सिंहगड कॉलेज येथे एम एसआरडीसी आणि आय आर बी यांच्या ऑफिसला भेट देऊन जोशवा साहेब यांच्याशी चर्चा केली त्यांच्या निदर्शनास हे आणून दिले की सोमाटणे टोल नाका हा अधिकृत जागेवरती नसल्याकारणाने सातारा सांगली कोल्हापूर बेंगलोर या रोडनी मुंबईसाठी येणाऱ्या गाड्या या लाखो स्वरूपात आहे पण सोमाटणे ते उर्से या तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये या लाखो गाड्यांना सोमाटणे टोलचा त्रास होत आहे व पैसे देखील भरावे लागत आहे यामधून अनधिकृत महसूल हा डेलीचा 25 ते 30 लाख रुपये जमा होत आहे हा कोणाच्या खिशात जात आहे याचा जाब विचारण्यात आला जर हा टोल घेणे बंद नाही केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरती उतरून जन आंदोलन उभे करणार आहे तरी आपण लवकरात लवकर हा टोल घेणे बंद करावे.तसेच उर्से टोलनाका हा जुन्या जागेवरून नवीन जागेत स्थलांतरित केला आहे त्यामुळे नवीन टोल नाक्या,पासून ते जुन्या टोलनाका पर्यंत लोकांना येण्या जाण्यासाठी काही सुविधा नसल्याकारणाने त्रास होत आहे व रात्री अपरात्री भीती देखील वाटत आहे त्यामुळे जुन्या टोल नाक्याच्या ठिकाणी बस थांबा करावा व हाय मास्ट लाईटची व्यवस्था करावी व 24 तास बस थांब्यावरती पोलीस अधिकारी असावेत जेणेकरून तळेगाव उर्से या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही अशा स्वरूपाचे आज निवेदन देण्यात आले आहे.निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सचिन भाऊ भांडवलकर,तालुका अध्यक्ष, अशोक कुटे,लोणावळा शहर अध्यक्ष, निखिल भोसले, लोणावळा शहर प्रवक्ते अमित भोसले,सुनील साळवे, पैलवान यश खळदे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page