व्यापारी संघटना,लोणावळा यांचेकडून लोणावळा रेल्वे प्रशासनाला निवेदन


मावळ मराठा न्यूज़ :- लोणावला, व्यापारी संघटना, लोणावळा कडून रेल्वे स्टेशन मॅनेजर श्री राजपुरोहित यांना लोणावळा स्टेशनवर येणाऱ्या सर्व लोकल ह्या नेहमी थांबत असलेल्या ठिकाण पासून फार मागे थांबू लागल्या आहेत.याबाबत रेल्वे स्टेशन मॅनेजर लोणावळा ह्यांना लेखी अर्ज देण्यात आला आहे. संघटने कडून सांगण्यात आले की पूर्वी थांबत असलेल्या जागेवर ह्या गाड्यांचा थांबा द्यावा तसेच लांब पल्यांच्या ट्रेन बाबत सुद्धा विनंती केली आहे.यावेळी लोणावला व्यापारी संघटना चे अध्यक्ष श्री दिलीप गुप्ता अध्यक्ष , श्री ललित सिसोदिया, श्री जयेश संचेती,श्री मांगीलाल जैन,श्री ललित ओसवाल,श्री केविल पत्रवाला व श्री नितिन श्रीश्रीमाळ उपस्थिति होते.




