*वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि रोटरी क्लब तळेगाव यांच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न,८२ जणांनी केले रक्तदान*

मावळ मराठा न्युज – वडगांव,दिनांक ११ ऑगस्ट २०२५ सोमवार रोजी वडगाव मावळ येथे वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि रोटरी क्लब तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उदघाटन वडगांव मावळ चे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय डी के अनभुले यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या अध्यक्षा ऍड रंजना भोसले,सचिव ऍड.प्रणोती पिंगळे,रोटरी क्लब ऑफ तळेगावचे अध्यक्ष रो. श्रीशैल मेंथे तसेच वडगाव मावळ येथे वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि रोटरी क्लब तळेगाव दाभाडे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात एकूण ८३ जणांनी रक्तदान केले. त्यात लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, ऍड वैशाली साबळे आणि प्रणोती पिंगळे या दोन महिला वकील भगिनींनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली.तर या कार्यक्रमाला भाजपचे रवींद्र भेगडे यांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदाते यांचे दोन्ही संघटनानी विशेष आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page