आयपीएस सत्य साई कार्तिक यांची धडक कारवाई,वेहेरगाव येथे ३६ हजार ची अवैध दारू सह तिघांना घेतले ताब्यात


मावळ मराठा न्यूज :-लोणावळा, महाराष्ट्राची आराध्य दैवत असलेल्या आई एकविरेच्या यात्रेदरम्यान माननीय पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार दिनांक २७ ते २९ मार्च दरम्यान कार्ला, वाकसई ,वेहेरगाव,वरसोली आणि मळवली येथे कोणत्याही प्रकारची दारूची विक्री करण्यास मनाई असताना लोणावळा विभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस सत्यसाई कार्तिक यांना अज्ञात बातमी दारा कडून मिळालेल्या माहिती नुसार स्वतः सत्यसाई कार्तिक आपल्या पथकासह ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा स्टाफ यांचेसह पायी पेट्रोलिंग करत असताना भूषण विनायक पडवळ,केशव नारायण चौधरी आणि नवनीत कोरोगा खंबाडी सर्व राहणार वेहेरगाव, ता.मावळ,जिल्हा पुणे यांच्या ताब्यात विदेशी दारूचा साठा एकूण ३६७२०/- रुपयाच्या मुद्देमालासह मिळून आले आहेत. सदर इसम यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.पोलीस उप विभागीय कार्यालय,लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारुती बारकु गोफने यांच्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन ला गुन्हा रजी क्रमांक ९४/२०२३,९५/२०२३ आणि ९६/२०२३ दाखल करण्यात आला आहे.




