निगडी येथील धार्मिक स्थळाजवळील दारू दुकानाचा बेकायदेशीर परवाना रद्द करा-युवराज दाखले

मावळ मराठा न्युज -पिंपरी,प्रतिनीधी,निगडी येथील ट्रान्सपोर्ट नगर येथे एका धार्मिक स्थळजवळ बेकायदेशीर परमिट रूम व बारचा परवाना उत्पादन शुल्क निगडी येथील धार्मिक स्थळाजवळील दारू दुकानाचा बेकायदेशीर परवाना रद्द करा-युवराज दाखलेविभागाकडून देण्यात आल्याची माहिती शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेला प्राप्त झाल्यानंतर संघटनेच्या वतीने संस्थापक/अध्यक्ष युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससाहेब यांना इमेलद्वारे निवेदन दिले आहे. सर्वोच न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे उलंघन करून पुणे येथील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दारू अस्थापना मालकाशी संगनमत करून , बेकायदेशीररित्या धार्मिक स्थळ शेजारी परमिट रूम व बार यांना दिलेला परवाना रद्द करून संबंधित उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे .संपर्क नंबर:- ९९२२३७३९५९

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page