आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आंदर मावळातील रस्त्यासाठी १ कोटी ९० लक्ष निधी

मावळ मराठा न्यूज़ :-आंदर मावळ- (दि.३० नोव्हेंबर २०२३) आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आंदर मावळातील भोयरे फाटा ते कल्हाट फाटा (इजिमा ६१) या रस्त्याच्या कामासाठी अर्थसंकल्प-२०२३ अंतर्गत सुमारे १ कोटी ९० लक्ष निधी उपलब्ध झाला आहे.या कामाचा भूमिपूजन समारंभ स्थानिक मान्यवरांच्या शुभहस्ते बुधवार (दि.२९) संपन्न झाला.दोन किलोमीटर असलेल्या सदर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे.भोयरे फाटा ते कल्हाट फाटा रस्ता चांगला व्हावा अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांच्याकडे स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत होती.या मागणीची दखल घेत सद्यस्थितीत ३.७५ मीटर असलेला रस्ता ५.५० मीटर करुन रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात येणार असल्याने ग्रामस्थांनी आमदारसाहेबांचे आभार मानले आहेत.प्रशस्त रस्ता झाल्यानंतर या भागातील दळणवळणास देखील अधिक गती मिळणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस संघटन मंत्री नारायण ठाकर, ह.भ.प. रोहिदास धनवे, मा.सरपंच विठ्ठल जाधव,बाबाजी गायकवाड, सरपंच कल्हाट शिवाजी करवंदे,उपसरपंच देवदास धनवे,सरपंच निगडे भिकाजी भागवत, उपसरपंच गणेश भांगरे, सरपंच भोयरे अमोल भोईरकर, उपसरपंच ऋषिकेश भोईरकर, नवनाथ पडवळ, माणिक तांबोळी, मोहन घोलप,संतोष करवंदे,मनोज करवंदे, तानाजी करवंदे, रवि पवार, भाऊसाहेब धनवे , बळिराम भोईरकर, किसान सेल अध्यक्ष दुंधाजी अगिवले, सोमनाथ अगिवले, मनिषा पवळे, रंजना पवार, धोंडिबा भागवत, किसन यादव, रामदास धनवे,संजय देशमुख, भागाजी यादव,शंकर कल्हाटकर आदि.मान्यवर उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page