शिवसेवा प्रतिष्ठानच्या संस्कार वर्गांचा स्तुत्य उपक्रम

मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोणावळा येथे शिवसेवा प्रतिष्ठानचे दोन संस्कार वर्ग नियमीत चालतात…या संस्कार वर्गातील मुलांनी गणेश उत्सवानिमित्त एक अनोखा उपक्रम सादर केला… लोणावळा येथील सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये दररोज स्तोत्र, मंत्र, गणपती अथर्वशीर्ष, गणेश पंचरत्न, आरती, मंत्रपुष्पांजली तसेच पसायदान सादर केले…या उपक्रमामध्ये संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लोणावळा भांगरवाडी येथील गणपती मंदिर, तालीम ओटा व हनुमान मंदिर, हुडको कॉलनी, अखिल मंडई गणेश मंडळ, महाराणा प्रताप गणेश मंडळ, जय महाराष्ट्र गजानन मित्र मंडळ, संत रोहिदास गणेश मंडळ, रायवूड येथील गणेश मंडळ, नेहरू मित्र मंडळ, अष्टविनायक गणेश मंडळ इत्यादी गणेश मंडळांमध्ये रोज सायंकाळी 6.30 ते 7. 30 सेवा केली.

संस्कार वर्गाच्या विद्यार्थ्यांचे सर्व नागरिकांकडून कौतुक झाले होत आहे… शिवसेवा प्रतिष्ठान च्या संस्कार वर्गाच्या संचालिका सौ. सुचेता खळदकर, ऋतुजा मेहता, सारिका फडके, सौ वीणा पिंगळे यांनी या निमित्त भरपूर मेहनत घेऊन मुलांची चांगली तयारी करून घेतली… या निमित्ताने नवीन पिढीतील लहान लहान मुलांवर आपल्या संस्कृतीचे उत्तम संस्कार होत आहेत अशा प्रतिक्रिया नागरीक देत आहेत.. लहान वयातच संस्कार झाल्यामुळे व चांगले पाठांतर झाल्यामुळे आपले ज्ञान नक्कीच पुढील पिढीपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचणार आहे… शिवसेवा प्रतिष्ठान चे राजेश येवले यांनी सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन सर्व कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page