पितृपक्ष निमित्त तळेगाव येथे वृद्धाश्रमात किराणा किट तर सजीवन वस्तीगृह येथील ३५ मुलींची वैद्यकीय तपासणी

मावळ मराठा न्युज – तळेगाव,तळेगाव येथे तळेगाव येथील निवृत्ती सेवा संघ वानप्रस्थाश्रम, तपोधाम वसाहत वृद्धाश्रमात येथे पितृ पंधरवड्याच्या औचित्य साधून १५ दिवसांचे किराणा सामान वाटप करण्यात आले.खंडेलवाल मेडिकलचे मालक तथा समाजसेवक नंदकिशोर खंडेलवाल उर्फ राजाजी यांच्या तर्फे राबविण्यात आला.या प्रसंगी लायन्स क्लब लोणावळा-खंडाळा चे सचिव निराली नालेकर, रिंपल पटवा,मंगेश कदम,रोहित थोरात तसेच मनशक्ती केंद्राचे डॉ. सुहास गोसावी, अजितजी फापले आणि श्रीमती अनुराधा कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.साप्ताहिक अंबर चें संपादक सुरेश साखळकर,डोळे व सुधीर राइलकर उपस्थित होते.याशिवाय विश्व हिंदू परिषद संचलित मुलींचे ‘सजीवन वस्तीगृह येथील ३५ मुलींची वैद्यकीय तपासणी डॉ.सुहास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली व त्यांना आवश्यक औषधेही देण्यात आली.या सामाजिक उपक्रमाद्वारे पितृ पंधरवड्याचे औचित्य साधून समाजसेवेचा उत्तम उपक्रम राबविण्यात आला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page