समर्थ मोटार्स – होंडा शो रूमचे मालक कै. शशीकांत गायकवाड यांचे दुःखद निधन

मावळ मराठा न्यूज :- लोणावळा,नांगरगाव येथील रहिवासी व समर्थ मोटार्स – होंडाचे मालक कै. शशीकांत गायकवाड यांचे सोमवार दिनांक ८/५/२०२३ रोजी पहाटे ६.१५ वा. निधन झाले. मागील रविवारी काही काम करत असताना झालेले अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांचेवर पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अतिशय प्रतिकूल परिस्थतीत अत्यंत कष्टातून व सचोटीने त्यांनी यश संपादन केले होते. अतिशय मनमिळाऊ दिलदार व प्रामाणिक व्यावसायीक अशी त्यांची ओळख होती. मोठा मित्रपरीवार व ग्राहकवर्ग त्यांचा चाहता होता. लोणावळा नगरपरिषदेचे माजी कर विभाग प्रमुख श्री सुरेश गायकवाड व लोणावळा सहकारी बॅंकेचे संचालक सुनिल गायकवाड यांचे ते लहान बंधू. अंत्यविधी आज दुपारी ३.०० वा वलवन येथे होईल.मावळ मराठा न्यूज परिवार कडून त्यांना भाव पूर्ण श्रद्धांजली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page