संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे लोणावळ्यात जंगी स्वागत




मावळ मराठा न्यूज़:- लोनावला , लोणावळ्यात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मराठा सकल समाज कडून जंगी स्वागत करण्यात आले.लोणावळ्यातील सेंटोर हॉटेल येथे आगमन झाले तिकडे त्यांचे लोणावळ्यातील भगिनी यांचे कडून औक्षण करण्यात आले जरांगे पाटिल यांनी छत्रपति शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण केला त्यानंतर त्यांचे कुमार चौकात जेसीबी तुन पुष्पहार आणि पुष्पवृष्टि करण्यात आली.यावेळी त्यांनी आज खोपोली येथे होणाऱ्या भव्य सभेला रवाना होण्या आधी मराठा आरक्षण साठी आपल्याला अशीच एकजुट दाखवावी लागेल वयोवृद्ध मानसा कड़े दुर्लक्ष केले पाहिजे असे छगन भुजबळ यांचे नाव न घेता जोरदार टिका केली.कोणी कितीही आड़ काठी घातली तरी आपण आपली एकजुट अशीच ठेवुया ,आपल्याला आरक्षण मिळणारच आहे. मुस्लिम ,धनगर समाज देखील आपल्या सोबत आहे .त्यामुळे कोणी कितीही आडवे आले तरी आपण आपले हक्काचे आरक्षण घेणार आहोत असा विश्वास जरांगे पाटील यांनी लोणावळ्यात जंगी स्वागताला उत्तर देताना व्यक्त केला . पश्चिम महाराष्ट्र देखील त्याच ताकद ने आपल्या पाठीशी उभा आहे हे विरोधकांना आता कळले असेल असे जरांगे पाटील यांनी सांगितले.




