साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णा भाऊ साठे जयंती उत्सव उत्साहात साजरा



मावळ मराठा न्युज :-पिंपरी – प्रतिनिधी, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णा भाऊ साठे प्रतिष्ठान दत्त नगर याठिकाणी डॉ आण्णा भाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात पार पडली.सर्व प्रथम साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णा भाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास मातंग समाज कृती समितीचे अध्यक्ष नेते संदिपान झोंबाडे व चंद्रकांत दादा लोंढे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष संतोष रनसिंग यांनी केले होते.यावेळी मातंग समाज कृती समितीचे डी पी खंडाळे, रामदास कांबळे, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक/अध्यक्ष युवराज दाखले, आबासाहेब मांढरे,राजु चव्हाण, प्रल्हाद कांबळे,श्रेयश लाटकर, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




