सुप्रसिद्ध ज्येष्ठ नेत्रतज्ञ मधुसूदन झवर लिखित “मधु संचय”पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

मावळ मराठा न्यूज:- तळेगांव,प्राजक्त प्रकाशन संस्थेचे जालिंदर चांदगुडेंनी सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले डॉ.मधुसूदन यांनी प्रास्ताविकात मधुसंचय या आपल्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या निर्मिती मागील आपली भूमिका स्पष्ट केली. पुस्तकाच्या लिखाणासाठी जे अपार कष्ट घेतले त्या आपल्या कै आप्पा कुलकर्णी या सन्मित्राप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली. या लिखाणात कुठलीही आत्मप्रौढी नाही तर नवीन पिढीला मानवीमूल्य जपण्याचा वसा देण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे हे आपल्या मनोगतात त्यांनी नमूद केल. विविध क्षेत्रातील आपले मित्र आपल्या परिवारवर प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट आणि खास करून आपली पत्नी डॉ. सौ राजकुवर यांच्याविषयीही डॉक्टरांनी ऋण व्यक्त केले. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या स्वागत सत्कारानंतर पद्मविभूषण डॉ. के एच संचेती यांच्या शुभहस्ते मधुसंचय या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न करण्यात आला. डॉक्टर संचेती यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना पुण्याच्या बीजे मेडिकलला विद्यार्थ्यांना शिकवत असताना असंख्य विद्यार्थ्यांशी संपर्क आला त्यातील डॉ. मधुसूदन हा माझा विद्यार्थी खास करून लक्षात राहण्याच कारण म्हणजे त्याच असलेलं वेगळेपण. नेत्रतज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर त्याही पलीकडे जाऊन त्याने अनेक शिबीर घेतली. मोतीबिंदू बरोबरच तिरळेपणाच्या शस्त्रक्रियेचं कौशल्य प्राप्त करून रुग्णांची सेवा केली. शिवाय क्रीडा क्षेत्रातील अत्यंत सन्मानाचा समजला जाणारा श्री छत्रपती शिवाजी अवॉर्डचा तो स्वतः मानकरी होऊन थांबला नाही तर त्याने अनेक विद्यार्थ्यांना हाच सन्मान मिळवून दिला. डॉक्टर संजय चोरडिया, प्राध्यापक मिलिंद जोशी,सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर डॉ.मधुसूदन यांच्या जीवन शैलीच्या विविध पैलूवर आपापल्या विशिष्ट शैलीतून प्रकाश टाकला. तळेगावचे लायन डॉ. शालिग्राम भंडारी आणि लायन सौ अनिता बाळसराफ यांनी आपले विचार मांडले. सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. सचिन काबरा यांनी आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page