दहा हजारांपेक्षा अधिक मतांनी लोणावळ्यात राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष विजयी होईल — आमदार सुनील शेळके







मावळ मराठा न्युज -लोणावळा,(श्रावणी कामत) लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष दहा हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी होणार, असा ठाम विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले हे विधान राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.मावळ तालुक्यातील सर्वंकष विकासकामांमुळे ‘विकासपुरुष’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या आमदारांनी लोणावळ्यातदेखील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारले. याच कामांच्या जोरावर येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येतील, असा आत्मविश्वास त्यांनी प्रचारसभेत व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांची प्रचार फेरी आज लोणावळ्यात उत्साहात पार पडली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र बबनराव सोनवणे तसेच प्रभाग क्र. १ ते ३ मधील उमेदवारांसह पांगळोली, तुंगार्ली, इंदिरानगर परिसरात नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक, सुरक्षा आणि परिसर विकास या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.प्रचार दौर्यात दिसून आलेला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि थेट विश्वास हा राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरल्याचं पक्षांतर्गत सूत्रांनी सांगितले. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दाखवलेली एकजूट पाहून आमदार शेळके यांनी नागरिकांना आवाहन केलं.“लोणावळ्याच्या सर्वांगीण विकासाची वेळ आली आहे. माझ्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा .”



