शासकीय आद्योगिक प्रशिक्षण संस्था.पिंपरी चिंचवड पुणे येथे शिवजयंती उत्साहात साजरी

मावळ मराठा न्युज- पिंपरी चिंचवड,शासकीय आद्योगिक प्रशिक्षण संस्था.पिंपरी चिंचवड पुणे येथे २२ फेब्रुवारी रोजी संपुर्णत: प्रशिक्षणार्थीनी आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. संस्थेचे प्रा.मा.शशिकांत साबळे यांनी याप्रसंगी प्रशिक्षणार्थीना संबोधित केले. कार्यक्रम चे प्रास्ताविक इलेक्ट्रिशियन विभागातील ऋतुजा करले आणि आभार प्रदर्शन वेल्डर विभागातील दर्शन पटुकले यांनी केले. तसेच विविध विभागातील प्रशिणाथ्यानी शिवाजी महाराज यांच्यावर भाषण केले. संस्थेचे सर्व कर्मचारी, प्रशिक्षणार्थी याप्रसंगी उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषभूषेत राज्यरोहण प्रसंगी महाराजांनी रयतेस उद्देशून केलेल्या संबोधनाने वेल्डर व्यवसायाच्या दिपक आमटे ने समारंभाची शोभा वाढवली. संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्व्हेअर व्यवसायाची प्रशिक्षणार्थीनी श्रद्धा दासरवार हिने केले. या प्रशिक्षणार्थीना या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन वेल्डर व्यवसायाचे निदेशक श्री शशिकांत ऐवळे व मशिनिष्ट व्यवसायाचे निदेशक श्री संतोष गुरव यांनी केले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी कडून सर्व प्रशिक्षणार्थीना मिठाई देऊन कौतुक केले

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page